काबुलमध्ये हॉटेलवर दहशतवादी हल्ला; 5 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

या हॉटेलमध्ये परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. तसेच आंतरराष्ट्रीय संमेलने याठिकाणी पार पडत असतात. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही.

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरातील इंटरकॉन्टीनेंटल हॉटेलवर शनिवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच नागरिक ठार झाले असून, हल्लेखोर चार दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चार दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरवात केली. हल्लेखोरांजवळ बंदूक आणि ग्रेनेड होते. या गोळीबारात पाच नागरिक ठार झाले असून, हल्ल्यानंतर हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर मोठी आग भडकली. नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सेक्युरिटीच्या जवानांनी कारवाई करत चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या हॉटेलमध्ये परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. तसेच आंतरराष्ट्रीय संमेलने याठिकाणी पार पडत असतात. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: international news 5 Dead In Kabul Hotel Attack