सुदर्शन पटनायक यांना अमेरिकेत प्रतिष्ठेचा पुरस्कार 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

न्यूयॉर्क - भारतातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या वाळू शिल्प महोत्सवात "पीपल्स चॉइस' या पुरस्काराने गौरविण्यात आले.

समुद्रातील प्लॅस्टिक प्रदूषणाविरोधात संदेश देणारे शिल्प त्यांनी येथे तयार केले होते. त्यांच्या या शिल्पाला जनतेकडून पसंतीची पावती मिळाली. बोस्टन येथे झालेल्या या महोत्सवाला पटनायक यांच्यासह जगभरातील 15 वाळूशिल्पकारांना आमंत्रित केले होते. "हा माझा मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार भारताला अर्पण करत आहे. आमचा देश प्लॅस्टिक प्रदूषणाविरोधात ठामपणे लढत आहे,' अशी प्रतिक्रिया पटनायक यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिली.

माझ्या वाळूशिल्पाला हजारो नागरिकांनी पसंती दिली, याचाच अर्थ त्यांनाही प्लॅस्टिक प्रदूषणाचे गांभीर्य मान्य आहे, असा दावाही पटनायक त्यांनी केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International sand artist Sudarshan Patnaik