esakal | पृथ्वीचं बाह्यरुप पाहिलंय? ISS ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच

बोलून बातमी शोधा

earth
पृथ्वीचं बाह्यरुप पाहिलंय? ISS ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच
sakal_logo
By
टीम ई सकाळ

लहानपणापासूनच प्रत्येकाला ग्रह, तारे, अवकाश यांच्याविषयी उत्सुकता असते. अवकाश पातळीमध्ये ग्रह-तारे कसं असतात, नेमकी या अवकाशाची रचना कशी असते हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं. त्यामुळेच अर्थ डे चं निमित्त साधत आंततराष्ट्रीय स्पेस स्टेशनने (ISS) हे एक व्हिडीओ शेअर करत अंतराळातून पृथ्वी नेमकी कशी दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. २२ एप्रिल रोजी ISS इन्स्टाग्रामवर पृथ्वीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

२२ एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात अर्थ डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये खास पद्धतीने हा दिवस साजरा होतो. त्यातच ISS ने देखील अंतराळातून पृथ्वीचा व्हिडीओ शेअर करत आपल्या भूमातेप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे.

"आरामात बसा आणि आनंद घ्या. आज अर्थ डेचं निमित्त साधत ISS मधून पृथ्वीचा घेतलेला एक व्हिडीओ दाखवत आहोत. आम्ही अजून काही जास्त बोलणार नाही. तुम्हीच हा व्हिडीओ पाहा आणि आनंद घ्या", असं कॅप्शन ISS ने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा: शौचालयात फ्लश केल्यावर करोनाचा संसर्ग वाढतो?

ISS ने शेअर केलेला व्हिडीओ १ मिनिटांपेक्षाही कमी कालावधीचा असून आत आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर 4 K असं लिहिण्यात आलं आहे. याचाच अर्थ 4 K म्हणजे हाय डेफिनेशन असल्यामुळे अंतराळातून पृथ्वीचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. या पृथ्वीवर ढगांसारखे पांढरे धुसर डाग असून मध्ये मध्ये हलक्या निळ्या रंगाच्या छटा दिसून येत आहेत.

दरम्यान, आतापर्यंत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तसंच हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत ISS चं कौतुकदेखील केलं आहे.