esakal | शौचालयात फ्लश केल्यावर करोनाचा संसर्ग वाढतो?

बोलून बातमी शोधा

शौचालयात फ्लश केल्यावर करोनाचा संसर्ग वाढतो?

शौचालयात फ्लश केल्यावर करोनाचा संसर्ग वाढतो?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन व डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. यामध्येच प्रत्येकानेदेखील खबरदारी म्हणून स्वत: ची काळजी घेणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं अनिर्वाय आहे. यामध्येच Physics of Fluids मध्ये प्रदर्शित झालेल्या अहवालात सार्वजनिक शौचालयातील फ्लशचा वापर केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे.

दीड वर्षांपूर्वी चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणून संपूर्ण जगभरात पाय पसरले आहेत. त्यामुळे या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक देशातील वैज्ञानिक सातत्याने काम करत आहेत. यामध्येच कोरोनाचा संसर्ग वाढविणाऱ्या ठिकाणं, वस्तू यांच्यापासून लांब राहण्याचं आवाहनदेखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यामध्येच आता सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्यावर किंवा त्यातील फ्लश केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू शकतो, असं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल वाचल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, फ्लश केल्यानंतर त्यातून उडणाऱ्या पाण्याच्या थेंबामधून कोरोनाचा प्रसार जलद गतीने होऊ शकतो.

हेही वाचा: कोरोनाग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणारा देवमाणूस!

फ्लश केल्यावर संसर्ग कसा पसरेल?

अहवालानुसार, शौचालयात फ्लश केल्यावर Aerosol निर्माण होतात. हे Aerosol बराच काळ हवेत राहतात. त्यामुळे शौचालयात जाणाऱ्या व्यक्तीच्या नाकावाटे हे Aerosol त्याच्या शरीरात प्रवेश करु शकतात. जर शौचालयात एखादा कोरोनाबाधित व्यक्ती गेला असेल तर त्याने फ्लश केल्यानंतर हवेत Aerosol निर्माण होऊ शकतात. जे अन्य व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करु शकतात. तसंच ज्या शौचालयामध्ये व्हेंटिलेशन नाही म्हणजेच हवा खेळती नाही अशा ठिकाणी कोरोना किंवा अन्य संसर्ग झपाट्याने पसरण्याची शक्यता अधिक असते.

साधारणपणे शौचालयात फ्लश केल्यावर घातक जीवजंतू नष्ट होतात असा समज आहे. परंतु, फ्लश केल्यानंतर शौचालयातील मल पाण्यासोबत वाहून जात असला तरीदेखील त्यातील जीवजंतू Aerosol च्या माध्यमातून हवेत पसरतात. यालाच वैज्ञानिक भाषेत toilet plumes असं म्हणतात. त्यामुळे फ्लश करतांना कधीही कमोडचं झाकण बंद करावं असा सल्ला दिला जातो.