International Women's Day : महिलांसाठी बनवले गूगल ने स्पेशल Doodle, एकदा पहाच...

या डूडलमध्ये गूगलने प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
International Women's Day
International Women's Day sakal

International Women's Day : आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस सर्वत्र साजरा केला जातोय. गुगलनेही महिलांच्या सन्मानासाठी एक स्पेशल डूडल बनवले आहे. गूगल ने आपल्या इंटरॅक्टिव डूडल मध्ये डेली लाइफमध्ये महिलांच्या योगदानाला दर्शवलंय. या डूडलमध्ये गूगलने प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

गूगलच्या डूडल वर क्लिक केल्यास एक पेज ओपन होतो. जिथे एक अॅनिमेशन दिसतं. या अॅनिमेशनवरवर वरुन खाली स्पार्कल पडतात आणि खाली महिलांच्या पाच हातांना दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (International Women s Day special google doodle With Theme Of Mutual Support)

Google प्रत्येक खास दिवशी डूडल बनवत असते. आपल्या डूडलच्या माध्यमातून गूगल त्या प्रत्येक खास दिवसाला आणखी खास दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गूगलच्या या स्पेशल Doodle ला अलीशा विनान्स (Alyssa Winans) नी इलस्ट्रेट केले आहे.

त्यांनी या डूडल विषयी सांगितले आहे या वर्षी महिला दिवसाची आमची थीम ‘Women Supporting Women’ आहे. महिलांनी दुसऱ्या महिलांना सपोर्ट केला पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. या इलस्ट्रेशनच्या मदतीने आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय.

International Women's Day
women day 2023 : आईच्या पाठबळाने स्नेहा यांची न्यायाधीश पदाला गवसणी

दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या दिवशी महिला दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरातील महिलांचे सामाजिक, आर्थिक, राजनितिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देणे होय.

गूगलद्वारा आज डूडलमध्ये महिलांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठविणे असो की विज्ञान आणि मेडिकल क्षेत्रातील महिलांचे योगदान असो, क्रिटिकल सपोर्ट सिस्टम किंवा इत्यादी क्षेत्रात महिलांनी केलेले उल्लेखनीय कार्य दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com