आयफोनचे आरेखनकार इव्ह 'ऍपल'मधून बाहेर

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जून 2019

'आयफोन' आणि 'आयमॅक'सब ऍपलच्या अनेक उत्पादनांचे आरेखन इव्ह यांनी केले आहे. आयफोनच्या लोकप्रियतेत त्यांच्या आरेखनांचा मोठा वाटा आहे.

कॅलिफोर्निया : जगभरात ज्यांच्या मोबाईल फोनने कायम उच्चतम दर्जा राखला, जे फोन प्रतिष्ठेचे प्रतीक बनले अशा 'ऍपल' कंपनीचे मुख्य आरेखनकार (डिझायनर) अधिकारी जॉनी इव्ह हे कंपनीतून बाहेर पडणार असल्याचे वृत्त 'ऍपल'ने एका निवेदनाद्वारे गुरुवारी दिले आहे. 

'आयफोन' आणि 'आयमॅक'सब ऍपलच्या अनेक उत्पादनांचे आरेखन इव्ह यांनी केले आहे. आयफोनच्या लोकप्रियतेत त्यांच्या आरेखनांचा मोठा वाटा आहे. या वरूनच इव्ह यांच्या कामगिरीचे महत्त्व लक्षात येते. इव्ह हे 20 वर्षांहून अधिक काळ 'ऍपल'मध्ये होते. त्यांना सर जोनाथन इव्ह या नावानेही ओळखले जाते. 'इव्ह हे या वर्षाच्या अखेरीस कंपनीचे कर्मचारी नसतील. ते स्वतःची 'लव्हफॉर्म' नावाची डिझाइन कंपनी सुरू करणार असून, 'ऍपल'साठी बाहेरून काम करणार आहेत. त्यांच्या मुख्य ग्राहक कंपनीत 'ऍपला' समावेश असू शकेल,' असे निवेदनात म्हटले आहे. 

इव्ह यांची कामगिरी 
- जगातील सर्वांत लोकप्रिय उत्पादन आरेखनकार 
- 1992 मध्ये "ऍपल'मध्ये प्रवेश 
- 'ऍपल न्यूटन'च्या निर्मित मदत 
- स्टीव्ह जॉब्स यांच्याबरोबर काम 
- 'आयपॅड' आणि 'मॅकबुक'चे आरेखन 
- आयफोनमध्ये टच स्क्रीन आणि बटणचे आरेखन 
- हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे आरेखनकार म्हणूनही कार्यरत 
- 'आयओएस-5'च्या डिझाइनची निर्मिती 

डिझाइनच्या जगात जॉनी हे एकमेवाद्वितीय आहे. 'आयमॅक'पासून 'आयफोन'पर्यंतचे आणि महत्त्वाकांक्षी 'ऍपल पार्क'च्या योजनेत त्यांनी सर्वस्व पणाला लावले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. विशेष उपक्रमांमध्ये 'ऍपल'ला त्यांच्या विद्वत्तेचा लाभ यापुढेही मिळेल. 
- टीम कुक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऍपल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The iPhones iconographer Jony Ive leave Apple