

Damage at a Kuwait power and desalination plant following an Iranian strike, highlighting rising Middle East tensions and impact on Indian workers.
esakal
मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या आखाती देशाच्या वीज मंत्रालयाने सोमवारी (३० मार्च) जाहीर केले की, कुवेत येथील एका वीज निर्मिती आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा बळी गेला. या इराणी हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या परिसरातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.