
इराणमधील बंदर अब्बासमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटानंतर लागलेल्या मोठ्या आगीमुळे घबराट पसरली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना दक्षिण इराणी बंदर शहरातील राजाई बंदरात घडली. हे एक महत्त्वाचे व्यवसाय केंद्र आहे. स्फोटात काही लोक जखमी झाले आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार ५६१ लोक जखमी झाले आहेत. इराणने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ४ जणांचा मृत्यू झाला आहे.