Iran Bushehr Nuclear Power Plant : इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प हे देशातील एकमेव कार्यरत अणुऊर्जा केंद्र असून, हा प्रकल्प आखाताच्या किनारपट्टीवर वसलेला आहे. तज्ञांच्या मते, जर या प्रकल्पावर हल्ला झाला आणि किरणोत्सर्गी (Radiation) गळती झाली, तर याचे गंभीर परिणाम फक्त इराणपुरते मर्यादित राहणार नाहीत. तर कतार, बहरीन, युएई आणि कुवेतसह पाच आखाती देशांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.