

इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेसह इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, २८ फेब्रुवारीला इराणमधील मिनाब शहरात एका प्राथमिक शाळेवर हल्ला झाला होता. यात १६० मुलींचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा सर्वात भयंकर असा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यावरून आता अमेरिकेवर मलाला यूसुफजईने टीका केलीय. तर अमेरिकेकडून आम्ही जाणीवपूर्वक हल्ला केला नसल्याचं सांगण्यात आलंय.