Middle East Conflict Deepens With Cross Border Attacks

Middle East Conflict Deepens With Cross Border Attacks

Esakal

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

Israel vs iran war इस्रायल इराण यांच्या युद्धात आता हिजबुल्लाहने उडी मारलीय. इराणला उघड पाठिंबा देत हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले केले आहेत. यानतंर प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं लेबनॉनवर हल्ला केलाय.
Published on

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहनेसुद्धा इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत. यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतपर्यंत घुसून विध्वंस केला आहे. इस्रायलने बैरूतमध्ये एअर स्ट्राइक केला. अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्र इराणवर हल्ला चढवला आहे. तर इराण आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना टार्गेट करत आहे. यातच आता हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात युद्ध पुकारलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com