
इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध आणखीच भडकले आहे. इस्त्रायलचे इराणवर हल्ले सुरु असतानाच आता इराणने इस्त्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या मुख्य कार्यालावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांने हल्ला केला आहे. इस्त्रायलची राजधानी तेल अव्हीवमध्ये मोसादचे मुख्य कार्यालय आहे. याच कार्यालयावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.