

Smoke rises from a damaged petrochemical facility following an alleged Israeli strike amid escalating Iran-Israel tensions in the Middle East.
esakal
इराण आणि अमेरिका-इस्रायल आघाडी यांच्यातील संघर्षाची आग अधिकच भडकत चालली आहे. इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर (पेट्रोकेमिकल झोनवर) एक मोठा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले असून, इतर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या पेट्रोकेमिकल क्षेत्राचे नेमके किती नुकसान झाले आहे, याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती इराणने अद्याप जाहीर केलेली नाही.