Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Middle East Tensions : इस्रायल किंवा अमेरिकेने या हल्ल्यांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर घालिबाफ यांनी अमेरिकेवर गुप्त हल्ल्याचा आरोप करत इराणी सैन्य सज्ज असल्याचे सांगितले.
Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला
Updated on

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिकाधिक धोकादायक बनत चालला आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली हवाई हल्ल्यांनंतर तेहरानच्या काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात इराणी लष्कराने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही पण, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये तेहरानच्या विविध जिल्ह्यांमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सर्वत्र पूर्णपणे अंधार पसरल्याचे दृश्य दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com