Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

Trump Warning to Iran April 2026: ट्रम्प यांनी बेटावरील महत्त्वाच्या तेलसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी जमिनीवर सैन्य पाठवण्याची धमकी दिली आहे. तर इराणने मंगळवारी पहाटे सौदी अरेबियावर सात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली.
Trump Warning to Iran

Trump Warning to Iran

esakal

Updated on

Iran-America War: ‘‘आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही; पण कदाचित तसे होईल,’’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणला निर्वाणीचा इशारा दिला. दुसरीकडे होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला दिलेली ४८ तासांची मुदत मंगळवारी रात्री संपण्यापूर्वीच अमेरिका आणि इस्राईलने इराणच्या ‘खर्ग’ बेटावर जोरदार हल्ला केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com