iran
iran

इराणचे सर्वात मोठे लढाऊ जहाज बुडाले

Summary

इराणचे सर्वात मोठे लढाऊ जहाज ( one of its largest navy ships) गल्फ ऑफ ओमानमध्ये ( Gulf of Oman) बुडाले आहे

तेहरान- इराणचे सर्वात मोठे लढाऊ जहाज ( one of its largest navy ships) गल्फ ऑफ ओमानमध्ये ( Gulf of Oman) बुडाले आहे. इराण मीडियाने यासंदर्भातील माहिती दिली असून याप्रकरणी तपास केला जात असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हे सर्वात मोठे लढाऊ जहाज होते. यामुळे इराणचे मोठे आर्थिक आणि लष्करी नुकसान झाले असल्याचं सांगण्यात आलंय. जहाजामध्ये आग लागली होती, त्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचं सांगण्यात आलंय. (Iran Largest Navy Ships Fire Sank Gulf of Oman)

खर्ग (Kharg) नावाचे लढाऊ जहाज आंतरराराष्ट्रीय समुद्री भागात युद्ध सरावासाठी तैनात करण्यात आले होते. यावेळी जहाजाला आग लागली. आग इंजिन भागात लागली होती. त्यामुळे जहाजाचे अनेक भाग वितळले आणि पाण्यात पडले. आग विझवण्यासाठी मदत टीमने 20 तास प्रयत्न केले, पण आग पसरण्यापासून रोखता आले नाही. जहाजावर जवळपास 400 कर्मचारी होती. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलंय. 33 जणांना शुल्लक जखम झाली आहे.

iran
लंकेच्या किनाऱ्यावर मालवाहू जहाज बुडाल्यानं मोठं नुकसान

नौदल कमांडर आणि अनेक वरिष्ठ अधिकारी याप्रकरणाचा तपास करणार आहेत. खर्ग जहाजावर मोठ्या प्रमाणात तेल साठ्याची क्षमता होती. शिवाय जड लष्करी उपकरणे वाहून नेण्याचीही याची क्षमता आहे. यावरुन मोठे हेलिकॉप्टरही वाहून नेले जाऊ शकतात. त्यामुळेच या सामरिकदृष्टा महत्त्वाच्या जहाजावर शत्रूंचा डोळा होता. असे असले तरी इराणने यासाठी कोणाला जबाबदार धरलं नाहीये.

इराण आणि परिसरातील देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इराणसोबतच्या अणु कराराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. याला इस्त्रायलने विरोध केलाय. समुद्री भागातही इराण आणि इस्त्रायलमध्ये तणावाची स्थिती आहे. 2019 पासून इस्त्रायलने इराणच्या किमान डझनभर तरी जहाजांना लक्ष्य केल्याचं यूएसचा रिपोर्ट सांगतो. पण, इस्त्रायलने याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास टाळलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com