पुन्हा सिलिंडरचा तुटवडा? LPG पुरवठ्यावर संकटाची छाया; इराणची कठोर भूमिका, तेल-वायू निर्यातीबाबत मोठी धमकी!

Iran's Gulf Export Warning Raises Concerns Over India's LPG Supply : इराणच्या आखातातून तेल व वायू निर्यात रोखण्याच्या इशाऱ्यामुळे भारतातील एलपीजी पुरवठा आणि गॅस सिलिंडरच्या दरांबाबत चिंता वाढली असून सध्या मात्र दरात कोणताही बदल झालेला नाही.
Iran Threatens Gulf Oil and Gas Exports, Raising India LPG Supply Concerns

Iran Threatens Gulf Oil and Gas Exports, Raising India LPG Supply Concerns

esakal

Updated on

अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला असून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने आखाती प्रदेशातून तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीबाबत कठोर इशारा दिला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, या प्रदेशात अमेरिकेची आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास आखातातून तेल आणि वायूचा "एक थेंबही" बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचे IRGC ने स्पष्ट केले आहे. या भूमिकेमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर तसेच भारतासह अनेक देशांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com