

iran pakistan
esakal
Iran Rejects Asim Munir's US Mediation: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निरोप घेऊन तेहरानमध्ये पोहोचलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना इराणमध्ये अत्यंत अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. मुनीर यांनी अमेरिकेचा गुप्त निरोप इराणच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख मोहसेन रेझाई यांच्यापर्यंत पोहोचवत इराणला आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत लवचिकता दाखवण्याचे आणि चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले होते.