गलतीसे मिस्टेक! इराणला इच्छा असूनही होर्मुझ खुली करता येईना; युद्ध सुरू होताच गडबडीत सुरुंग पेरले, आता सापडेनात

Iran Sea Mines in Strait Of Hormuz इराणने युद्ध सुरू होताच होर्मुझच्या सामुद्रधुनीत घाईगडबडीत समुद्री सुरुंग पेरले आहेत. मात्र आता त्यांना अनेक सुरुंगाचे लोकेशन सापडत नसल्यानं नवं आव्हान निर्माण झालं आहे.
strait of hormuz

strait of hormuz

esakal

Updated on

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेसाठी बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीआधी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे भारतासह जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार होर्मुझ पूर्ण खुली न करण्यामागे इराणची रणनिती नसून त्यांच्या समोर एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com