पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारूः सुलेमानी

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मार्च 2019

तेहराणः पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत?. इराणचा संयम पाहू नका, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, अशा शब्दात इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या त्रासाला इराणनेही तीव्र शब्दात इशारा देताना सुलेमानी म्हणाले, 'पाकिस्तानने इराणवर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले, तर इराणही पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवेल. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा इराणलाही नाहक त्रास होत आहे. या संघटनांवर पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे इराणही पाकिस्तानच्या सीमारेषेवर भींत बांधण्याची योजना आखत आहे.'

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली. पाकिस्तानची दहशतवाद्यांच्या मुद्यावरून जगभरातून कोंडी होऊ लागली आहे. भारताप्रमाणे इराणलाही दहशतवादाचा फटका बसत असल्यामुळे इराणनेही पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानला दहशतवादाची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख हेशमातोल्लाह फलाहतफिशेह यांनीही पाकिस्तान दिला आहे. दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्यामुळे पाकिस्तान अडचणीत आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran threatens action against Pakistan-based terrorist groups