इराणच्या टॉप अणु वैज्ञानिकाची हत्या; हल्ल्यामागे इस्त्राईलचा हात?

iran1.
iran1.

तेहरान- इराणमधील प्रसिद्ध अणु वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची राजधानी तेहरानमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. मोहसेन यांना कारमध्येच असताना गोळ्या झाडण्यात आल्या आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून यासाठी इराणने इस्त्राईलला जबाबदार धरले आहे. इराणचे संरक्षणमंत्री यांनी निवेदन जारी करुन म्हटलंय की, वैज्ञानिक मोहसेन फखरीजादेह गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या कारवर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. 

संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, ''रिसर्च आणि इनोव्हेशन संघटनेचे नेतृत्व करणारे मोहसेन फखरीजाहेद यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, पण ते शहीद झाले. फखरीजादेह तेहरान प्रांताच्या पूर्व दमावंद काऊंटी भागात कारमधून प्रवास करत होते.''  हत्येच्या घटनेनंतर एका न्यूज चॅनेलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की इस्त्राईलचे मोहसेन फखरीजादेह यांच्याप्रती शत्रूत्व होते. फखरीजादेह इराणच्या अणु प्रकल्पाचे नेतृत्व करत होते. इस्त्राईलचे प्रमुख बेंजामीन नेतन्याहू यांनी अनेकदा त्यांचा उल्लेख शत्रू म्हणून केला होता.  

औषध कंपन्यांचे 'अच्छे दिन'; अझीम प्रेमजींपासून-बिल गेट्स यांनी केलीय...

वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांच्या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचे गंभीर संकेत मिळत आहेत, असं इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ म्हणाले आहेत.  जरीफ यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ''दहशतवाद्यांनी आज एका प्रसिद्ध इराणी वैज्ञानिकाची हत्या केली. यामध्ये इस्त्राईलची भूमिका असल्याचे गंभीर संकेत मिळत आहेत. यातून त्यांची निराशा समोर येत आहे.'' जरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या घटनेची निंदा करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, इस्त्राईल आणि इराणमध्ये कट्टर शत्रूत्व आहे. उभय देशांमधून विस्तवही जात नाही. इराणने इस्त्राईला राष्ट्र म्हणून कधीच मान्यता दिलेले नाही. शिवाय काही दिवसांपासून इस्त्राईलने काही अरब राष्ट्रांशी मैत्री करार केले आहेत. इस्त्राईल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील संबंध चांगलेच सुधारले आहेत. या पार्श्वभूमीवर इराण इस्त्राईलवर चिडून आहेत. त्यातच आता इराणच्या एका प्रसिद्ध वैज्ञानिकाची हत्या झाल्याचा प्रकार घडल्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक चिघळतील यात शंका नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com