
शेअर बाजाराच्या इतिहासात फार्मा कंपनीचे शेअर उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. 23 मार्च 2020 ला फॉर्मा इंडेक्समध्ये 6,242.85 अंशावरुन 12,528.85 अंशावर झेपावला. फार्मा सेक्टरमध्ये दुप्पट वाढ झाली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक क्षेत्राची वाताहत झाली असताना या संकटजन्य परिस्थितीनं औषध कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणू करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. अनेक कंपन्यांना शेअर्समध्ये 200 टक्केहून अधिक नफा मिळाला आहे.
फार्मा क्षेत्रात तेजीचे वातावरण
शेअर बाजाराच्या इतिहासात फार्मा कंपनीचे शेअर उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. 23 मार्च 2020 ला फॉर्मा इंडेक्समध्ये 6,242.85 अंशावरुन 12,528.85 अंशावर झेपावला. फार्मा सेक्टरमध्ये दुप्पट वाढ झाली.
अनेक कंपन्याना झाला मोठा फायदा
मार्चनंतर सर्वच फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाले. डॉ. रेड्डी, मेट्रोपोलिस, सिपला, अपोलो, सनफार्मा, बायोकॉन या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. मार्चपासून आतापर्यंत या कंपन्यांनी पूर्वीच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे.
शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे ध्येय
सात भारतीय कंपन्या लस बनवण्याच्या शर्यतीत आघाडीवर
भारत बायोटेक, सीरम इंस्टीट्यूट, जायडस कॅडिला, पेनेसिया बायोटेक, इंडियन इम्यूनोलॉजिकल्स, मिनवॅक्स आणि बायोलॉजिकल ई या भारतीय कंपन्यामध्ये कोरोनावरील लस बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना लस बनवण्याच्या शर्यतीत जगभरातील 23 कंपन्यांचा समावेश आहे. यातील एमजेन आणि एडेप्टिव बायोटेक्नोलोजी, अल्टीम्यूनी, बायोएनटेक आणि फाइझर, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, जॉनसन एंड जॉनसन, मोर्डना, नोवावॅक्स यांचा समावेश आहे.
श्रीमंत गुतवणूकदारांची मांदियाळी
जगभरात कोरोना लस कधी येणार याची उत्सुकता आहे. औषधांची वाढती मागणी लक्षात घेता गुंतवणुकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. प्रेमजींपासून बिल गेट्स यांनी या क्षेत्रात पैसा लावला आहे. कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये अझीम प्रेमजींपासून ते बिल गेट्स या मोठ्या उद्योजकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी मॉर्डर्ना कंपनी गुंतवणूक केली आहे. मॉडर्ना कंपनीने 94 लस प्रभावी असल्याचा दावा केलाय.