इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Iran-US Conflict Aimed at Stopping India and China : भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेवर गंभीर आरोपही केले.
Iran-US Conflict Aimed at Stopping India and China

Iran-US Conflict Aimed at Stopping India and China

esakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेवर टीका करताना म्हटले की, जगात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अमेरिका जाणीवपूर्वक विविध ठिकाणी युद्धे घडवून आणत आहे. इलाही यांनी असा आरोपही केला की, इराणसोबतचा संघर्ष हा भारत आणि चीन यांसारख्या देशांना शक्तिशाली होण्यापासून रोखण्यासाठी सुरू आहे. अमेरिकेचे उद्दिष्ट जगावर आपले वर्चस्व टिकवून ठेवणे हेच असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com