Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Iran War इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांनी अमेरिकेला जमिनीवर सैन्य उतरवण्याचे थेट आव्हान दिले आहे. अमेरिकेने केवळ हवाई आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांऐवजी इराणच्या भूमीवर प्रत्यक्ष लष्करी कारवाई करावी, असे रेझाई म्हणाले.
Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’
Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून अमेरिकेला सातत्याने आक्रमक इशारे दिले जात आहेत. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांनी अमेरिकेला थेट आव्हान देत, युद्धाबाबत अमेरिका खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी इराणच्या भूमीवर जमिनीवरील सैन्य उतरवावे, असे म्हटले आहे. दरम्यान, रेझाई यांनी अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी इराणच्या काही अटीही कतारच्या माध्यमातून वॉशिंग्टनपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com