Iran US Relations: अणुकार्यक्रमावर इराण-अमेरिकेत चर्चा; पहिल्या फेरीत संवाद पुढे नेण्यावर भर; आणखी बैठक होणार
Background of Iran US Nuclear Talks: इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये अप्रत्यक्ष चर्चा झाली. अणुकरार अयशस्वी ठरल्यास गंभीर परिणामांचा इशारा अमेरिकेने दिला.
मस्कत : अणुकार्यक्रमावर इराण आणि अमेरिकेमध्ये शुक्रवारी अप्रत्यक्ष चर्चा झाली. या चर्चेत पुन्हा एकदा इराणच्या अणुकार्यक्रमावर संवाद कसा पुढे न्यावा यावर भर देण्यात आला.