

अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स कंपनीची स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा इराणने अमेरिकन लष्कराविरोधातील लष्करी कारवायांसाठी वापरल्याचा दावा समोर आला आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यासाठी इराणने या सेवेचा आधार घेतल्याची माहिती एका गोपनीय लष्करी अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे स्टारलिंकच्या वापराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा