US President Donald Trump discusses the ongoing Iran conflict and ceasefire conditions, highlighting demands for Iran to abandon its nuclear program amid rising tensions in the Strait of Hormuz.
esakal
Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की तूर्तास ते इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी कोणताही करार करण्यास तयार नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, जरी इराणला करार करण्यात स्वारस्य असले तरी सध्या चर्चेसाठी समोर आलेल्या अटी अपुऱ्या आहेत. पण अशा कराराच्या अटींमध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की, जर कोणताही करार झाला तरी त्यामध्ये इराणने आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून द्यावा, ही अट अनिवार्यपणे समाविष्ट असेल.

