

Iran Warns America Of Severe Consequences If Its Leader Is Harmed
Esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढला असून आता इराणच्या सशस्त्र दलाच्या एका प्रवक्त्यानं थेट ट्रम्प यांना धमकी दिलीय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नका अन्यथा याचे परिणाम भयंकर होतील असा इशारा इराणनने दिलाय. ट्रम्प यांनी खामेनेई यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर काही दिवसातच इराणकडून इशारा देण्यात आलाय.