पासपोर्ट झाले जुने, आता डोळेच करतील सर्व काम; जाणून घ्या नवी टेक्नोलॉजी?

iris scan
iris scan

दुबई- आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वाधिक व्यस्त दुबई एअरपोर्ट आपल्या सेवेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता देशाने असं एक फीचर आणलं आहे, जे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटापेक्षा कमी नाही. आता दुबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आय-स्कॅनर लावण्यात आलं आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी झाला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आर्टिफिशल इंटेलिजेंसचा वापर करण्यासाठी कॉन्टॅक्टलेस टेक्नोलॉजीचे प्रमोशन केले जात आहे. ही सेवा मागील महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता काही सेकंदात पासपोर्ट कंट्रोलचे काम पूर्ण होऊन लोक फ्री होतील. यामुळे एअरपोर्टवर मोठ्या रांगा देखील लागणार नाहीत. 

काही सेंकदात होईल काम 

आयरिस-डेटा देशाच्या फेशियल रिकग्निशन डेटाबेससोबत जोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पासची आवश्यकता लागणार नाही. एमिरेट्स आणि दुबईच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून डेटा गोळा करण्याचे काम केले जाते आणि चेक-इनपासून बोर्डिंग पर्यंत सर्व एकच प्रक्रिया असते. एमिरेट्सच्या बायोमेट्रिक प्रायव्हेसी स्टेटमेंटनुसार, एअरलाईन प्रवाशांच्या चेहऱ्याला त्यांच्या खासगी डेटासोबत जोडले जाते. यामध्ये पासपोर्ट आणि फ्लाईटसंबंधी माहिती असते. 

प्रवाशांवर निगराणी तर नाही?

संयुक्त अरब अमिरातीने हे आधुनिक तंत्रज्ञान आणले असले तरी याबाबत काही शंकाही घेण्यात आली आहे. यूएई पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. अशाप्रकारचा डेटा गोळा करणे म्हणजे खासगीपणावर घाला असल्याची टीका केली जात आहे. पण, एमिरेट्सने यावर स्पष्टीकरण दिलं असून एअरपोर्टने लोकांचा खासगी डेटा सुरक्षित ठेवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा डेटा थर्ड पार्टीला देत नसल्याचं स्पष्ट केलंय. 

एअरपोर्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलंय की, आर्टिफिशल इंटेलिजेंस ज्या ठिकाणी असते, तेथे शंका उपस्थित होणे साहजिकच आहे. कोणत्याही देशात ही शंका घेतली जाऊ शकते. आयरिन स्कॅन पद्धत हळूहळू काही देशांमध्ये वापरली जाऊ लागली आहे. पण, हा निर्णय सुरुवातापासूनच वादग्रस्त ठरला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com