खरंच डेल्टाक्रॉन अस्तित्वात आहे? नव्या स्ट्रेनबद्दल संशोधक काय म्हणतात?

corona update
corona updatesakal Media

जगभरात सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. या नव्या व्हेरियंटच्या आगमनामुळे कोरोनाची तिसरी लाट आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डेल्टा या व्हेरियंटमुळे याचप्रकारे कोरोनाची (Corona) दुसरी लाट आली होती. डेल्टा हा अत्यंत घातक असा व्हेरियंट ठरला होता. त्या लाटेतून जग आता कुठे सावरत असताना पुन्हा आता ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे चिंता वाढली आहे. दुसरीकडे आता या चिंतेत आणखी भर टाकणारा एक नवा शोध लागला आहे. सायप्रसमधील एका संशोधकाने डेल्टा आणि ओमिक्रॉन (Omicron) या दोन व्हेरियंट्सना एकत्र करणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या एका नव्या व्हेरियंटचा शोध लावला आहे. या व्हेरियंटला डेल्टाक्रॉन (Deltacron) असं नाव देण्यात आलंय.

corona update
CM चन्नींनी प्रियंका गांधींना का दिली मोदींच्या सुरक्षेची माहिती? भाजपचा नवा सवाल

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या Omicron च्या सावटाखाली असताना दुसरीकडे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटच्या शोधामुळे भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर देखील डेल्टाक्रॉनवर चर्चा सुरु झाल्या आहेत. एकीकडे सोशल मीडियावर हा शब्द ट्रेंड करत असताना अनेक तज्ञांनी मात्र असं मत व्यक्त केलंय की, हा व्हेरियंट वास्तवात अस्तित्वातच नाहीये. मात्र, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याचाच शोध घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय.

आतापर्यंत आपल्याला काय माहितीय?

1. सायप्रस विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी या स्ट्रेनला 'डेल्टाक्रॉन' म्हटले आहे. अहवालानुसार डेल्टा जीनोममध्ये ओमिक्रॉन सारख्याच अनुवांशिक हालचाली आहेत.

2. डेल्टाक्रॉनची 25 प्रकरणे आतापर्यंत आढळली आहेत, असा रिपोर्ट ब्लूमबर्गने दिला आहे. मात्र, या स्ट्रेनबद्दल किंवा या बाधित प्रकरणांबद्दल बऱ्याच गोष्टी अज्ञात आहेत.

3. एका मुलाखतीत कोस्ट्रिकिस यांनी म्हटलंय की, "हा स्ट्रेन कितपत पॅथॉलॉजिकल किंवा कितपत अधिक संसर्गजन्य आहे किंवा होऊ शकतो, याचा आम्ही शोध घेतोय.

4. 7 जानेवारी रोजी 25 डेल्टाक्रॉन प्रकरणांचे नमुने व्हायरसमधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी GISAID कडे आंतरराष्ट्रीय डेटाबेस पाठवण्यात आला.

corona update
भारताच्या 'या' उदारतेवर तालिबान खूश; अफगाणिस्तानचा 'आनंद' गगनात मावेना

याची नोंद घेणं अत्यंत गरजेचं आहे की, डेल्टाक्रॉन हे कोणतेही अधिकृत नाव नाहीये. याआधी, डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या संयोजनासाठी डेल्मिक्रॉन हा शब्द लोकप्रिय झाला होता. ही WHO ने दिलेली अधिकृत नावे नाहीत. हे अधिकृतपणे मान्य केलेले प्रकार नाहीत.

अलिकडच्या काळात, Omicron व्यतिरिक्त आणखी एका नवीन व्हेरियंटचा प्रकार समोर आला असून, IHU असं त्याचं नाव आहे. Omicron आणि IHU हे दोन्ही व्हेरियंट नोव्हेंबरमध्ये प्रथमच समोर आले आहेत. Omicron हा सध्या प्रमुख व्ह्रेरियंट चर्चेत असून IHU तितका चर्चेत नाही. इस्रियलमध्ये अलीकडे फ्लोरोनाची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी कोरोना आणि फ्लूचा दुहेरी संसर्ग असल्याचे मानले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com