CM चन्नींनी प्रियंका गांधींना का दिली मोदींच्या सुरक्षेची माहिती? भाजपचा नवा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambit Patra

CM चन्नींनी प्रियंका गांधींना का दिली मोदींच्या सुरक्षेची माहिती? भाजपचा नवा सवाल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये असताना सुरक्षा व्यवस्थेमध्ये घडलेल्या त्रुटींमुळे राजकीय वातावरण अद्यापही तापलेलंच आहे. भाजपने यासंदर्भात काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली असून काँग्रेस पक्षाने हे मुद्दाम घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच आरोपांमधील पुढची कडी आज भाजपने केली आहे. भाजपने आज रविवारी नवे प्रश्न उभे केले आहेत. पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव न घेता काँग्रेसला काही प्रश्न केलेत.

हेही वाचा: देशभरात नवे निर्बंध? पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्वाची बैठक

त्यांनी म्हटलंय की, एका विद्यमान मुख्यमंत्र्याने प्रियंका गांधी वाड्रांना पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची माहिती दिलीच कशासाठी? प्रियंका यांच्याजवळ असं कोणतं संवैधानिक पद आहे? त्यांना पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती का पुरवण्यात आली? असा नवा सवालच त्यांनी केला आहे. यामार्फत मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यातील सुरक्षेची माहिती प्रियंका गांधींना आधीपासूनच माहिती असल्याचा दावाच त्यांनी एकप्रकारे केला आहे.

पात्रा इथंवरच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत विचारलं की, प्रियंका कोण लागून गेल्या, ज्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेची माहिती हवी असते? संबित पात्रांनी पुढे म्हटलं की, मला पूर्ण विश्वास आहे की, गांधी कुंटुब या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट पद्धतीने मांडेल.

हेही वाचा: मोदी लाटेतही फुललं नाही कमळ, आता SP च्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग?

मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलं होतं की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला कसलाही धोका वगैरे काही नव्हता. ते पूर्णपणे सुरक्षितच होते. या प्रकरणी मी प्रियंका गांधींशी बातचित केली आहे आणि त्यांना या प्रकरणाशी अवगत केलं आहे. चन्नी यांनी केलेल्या या वक्तव्यावरुनच आता भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने काँग्रेस आणि मुख्यमंत्री चन्नी यांना निशाण्यावर घेतलंय. पात्रा यांनी चन्नींवर निशाणा साधत पुढे म्हटलंय की, चन्नी साहेब थोडं प्रामाणिक व्हा. तुम्ही प्रियंका गांधींना जरुर असं म्हटलं असेल की काम झालं. जे सांगितलं होतं तसं केलंय. म्हणजे तुम्ही जे काम सांगितलं होतं ते झालेलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top