‘फॉर्च्युन’च्या यादीत ईशा व आकाश अंबानी; आदर पूनावाला, बायजू रवींद्रन यांचाही समावेश

पीटीआय
Thursday, 3 September 2020

‘फॉर्च्युन’च्या अहवालानुसार ईशा आणि आकाश अंबनी यांनी रिलायन्स जिओला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रवींद्रन यांनीही ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील यशस्वी कंपनी उभी केली आहे.

न्यूयॉर्क - रिलायन्स जिओचे संचालक ईशा अंबानी आणि आकाश अंबानी, सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला, बायजूचे सहसंस्थापक बायजू रवींद्रन यांना फॉर्च्युनच्या ‘४० अंडर ४०’ यादीत स्थान देण्यात आले आहे. 

वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, राजकारण आणि माध्यमे व मनोरंजन या विभागातील ‘फॉर्च्युन’ यादी जाहीर करण्यात आली. प्रत्येक यादीत जगभरातील ४० जणांचा व वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे अशा नावाचा समावेश करण्यात आला आहे. ईशा आणि आकाश अंबानी यांचं नाव तंत्रज्ञान या विभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘फॉर्च्युन’च्या अहवालानुसार ईशा आणि आकाश अंबनी यांनी रिलायन्स जिओला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रवींद्रन यांनीही ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रातील यशस्वी कंपनी उभी केली आहे. लक्षावधी विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून गणित आणि विज्ञान असे अवघड विषय समजून घेणे सोपे झाले, असे फॉर्च्युनने म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना काळात आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सिरमचे लस तयार करण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे ‘फॉर्च्युन’ने म्हटले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यांचाची समावेश
सॉफ्टबँक ग्रूपचे अक्षय नहेटा, टीडी आमेरीट्रेडच्या सुनयना तुतेजा, शिओमी इंडियाचे मनूकुमार जैन, माव्हेरिक व्हेंचर्सचे अंबर भट्टाचार्य, फार्म इझीचे धवल शाह, धर्मिल शेठ आणि एसीएलयूच्या दीपा सुब्रह्मण्यम यांचाही या यादीत समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isha and Akash Ambani debuted on Fortune 40 Under 40 list