लादेनला कसं ठार केलं? आमच्यामुळेच ते शक्‍य झालंय..! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी खान येथे आले आहेत. 'फॉक्‍स न्यूज'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना लादेनविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी खान म्हणाले, "ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा आम्हीच अमेरिकेला कळविला. 'आयएसआय' या संस्थेने मेहनतीने ही माहिती मिळविली होती. यासंदर्भात तुम्ही 'सीआयए'लाही विचारू शकता. लादेनविषयी आम्ही अमेरिकेला फोनवरून कळविले होते.'' 

वॉशिंग्टन : पाकिस्तानने मदत केली, म्हणूनच अमेरिकेवर हल्ला करून संपूर्ण जगाला हादरवणारा दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात यश आले, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल (सोमवार) केला. इम्रान खान सध्या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका मुलाखतीमध्ये त्यांनी असा दावा केला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी खान येथे आले आहेत. 'फॉक्‍स न्यूज'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना लादेनविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावेळी खान म्हणाले, "ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा आम्हीच अमेरिकेला कळविला. 'आयएसआय' या संस्थेने मेहनतीने ही माहिती मिळविली होती. यासंदर्भात तुम्ही 'सीआयए'लाही विचारू शकता. लादेनविषयी आम्ही अमेरिकेला फोनवरून कळविले होते.'' 

खान यांचा हा दावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये या प्रकरणी पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेलाच खान यांनी छेद दिला आहे. अमेरिकी कमांडोंच्या पथकाने 2 मे, 2011 रोजी इस्लामाबादच्या जवळ असलेल्या अबोटाबाद येथे कारवाई करत लादेनला ठार मारले होते. 'लादेन पाकिस्तानमध्ये लपला होता, याची काहीही माहिती आम्हाला नव्हती', अशी भूमिका पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली होती. 

विशेष म्हणजे, 'सीआयए'ला लादेनचा पत्ता शोधण्यास मदत केल्याबद्दल पाकिस्तानी प्रशासनाने डॉ. शकील आफ्रिदी यांना तुरुंगात डांबले आहे. या प्रकरणी भाष्य करताना खान यांनी सारवासारव करण्याचाच प्रयत्न केला. आफ्रिदी यांची सुटका करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत. 'आफ्रिदी यांचा विषय पाकिस्तानी जनतेसाठी भावनिक आहे. आफ्रिदी हे अमेरिकेचे गुप्तहेर म्हणून काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे', असे खान म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISI helped CIA to track down Osama Bin Laden says Pak PM Imran Khan