

Israel Airstrike on Gaza: इस्रायलने गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलांच्या माहितीनुसार हवाई दल गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. १९ जानेवारी रोजी इस्रायल-हमास युद्धबंदी सुरू झाल्यानंतर गाझामध्ये इस्रायलचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.