

Middle East On Edge After Israel Iran Military Escalation
Esakal
मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला असून इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी यानंतर देशात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये हवेत धुराचे लोट पसरले आहेत. मध्य आशियात अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना इस्रायल इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेनं शनिवारीच त्यांच्या नागरिकांना इस्रायल सोडण्याचे आदेश दिले होते.