लाईव्ह न्यूज

Israel-Iran War : इस्त्रायल-इराण संघर्ष शिगेला! इस्त्रायलचा न्यूक्लियर सायबर हल्ला; ‘मोसाद’चा धक्कादायक कारनामा उघड, पुढे जे झालं...

Israel Cyber attack on Iran nuclear facility : इराणच्या नटांझ अणुऊर्जा प्रकल्पावर इस्त्रायलने सायबरहल्ला करत गंभीर नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'स्ट्रक्सनेट' सारख्या घातक सायबर शस्त्राद्वारे हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Israel Cyber attack on Iran nuclear facility
Israel Cyber attack on Iran nuclear facilityesakal
Updated on: 

Israel-Iran Nuclear Cyber Attack : इराणच्या अतिसंवेदनशील नटांझ अणुऊर्जा प्रकल्पात नुकत्याच घडलेल्या वीज खंडित घटनेमागे इस्त्रायलचा सायबरहल्ला असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. इस्त्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने या प्रकल्पावर अत्याधुनिक सायबर हल्ला केला असून, यामध्ये अणुउर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेंट्रिफ्यूज यंत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना काहीशी नवीन नसून, यापूर्वीही इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्त्रायलने योजनाबद्ध हल्ले, स्फोट आणि शास्त्रज्ञांची हत्या यांसारख्या कारवाया केल्या आहेत. याच साखळीतील हा नवा हल्ला असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इराणच्या अणु ऊर्जा संस्थेचे प्रमुख यांनी याला "अणु दहशतवाद" असे संबोधले आहे.

'स्ट्रक्सनेट' - अणुउद्योगासाठी घातक व्हायरस

या सायबरहल्ल्यामध्ये २०१० मध्ये जगभर प्रसिद्ध झालेला Stuxnet नावाचा अत्याधुनिक संगणक व्हायरस वापरण्यात आला असण्याची शक्यता आहे. या व्हायरसचा उद्देश फक्त माहिती मिळवणे नसून, प्रत्यक्षात यंत्रणा नष्ट करणे आणि त्याच्या सेन्सर्सना चुकीची माहिती देणे असा होता. इराणच्या सेंट्रिफ्यूज यंत्रणांवर परिणाम करताना, व्हायरसने त्यांच्या गतीमध्ये फेरबदल करत त्यांना कायमस्वरूपी नष्ट केले.

Israel Cyber attack on Iran nuclear facility
Cyber Security : तब्बल 1600 कोटी पासवर्ड अन् ईमेल लीक! गुगलने सांगितली ट्रिक; हॅकिंगपासून स्वतःला सुरक्षित ठेवा एका क्लिकवर..

एका नामवंत संगणक इंजिनियरने या हल्ल्यावर भाष्य करताना सांगितले की, हे फक्त तांत्रिक युद्ध नसून आधुनिक काळातील ‘सायबर युद्ध’ आहे. हे हल्ले इतके सूक्ष्म पद्धतीने होतात की, अणुशास्त्रज्ञ अनेक वर्षे सेंट्रिफ्यूज यंत्रांतील त्रुटींचे कारण शोधत राहतात.

कसे घडते असे हल्ले?

या सायबरहल्ल्याचे प्रमुख साधन म्हणजे ‘फिशिंग’ ज्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे पासवर्ड किंवा संवेदनशील माहिती हॅकर्सकडे जाते. एकदा का प्रवेश मिळाला, की मग त्यातून नेटवर्कमध्ये प्रवेश करून संपूर्ण प्रणालीचा ताबा घेता येतो.

Israel Cyber attack on Iran nuclear facility
Exercise Tips : जिमला जाणाऱ्यांनो! रोज एकसारखा व्यायाम करणे जास्त धोकादायक; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

‘चेरनोबिल’सारख्या आपत्तीची भीती

अणुऊर्जा प्रकल्पातील रेडिओऍक्टिव्ह सामग्रीचा स्फोट झाल्यास ‘चेरनोबिल’सारखी भयानक दुर्घटना घडू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. एका सेंट्रिफ्यूजचा स्फोट झाला तर इतर अनेक यंत्रे त्याच्या झटक्याने नष्ट होऊ शकतात आणि रेडिओऍक्टिव्ह कचरा परिसरात पसरू शकतो.

इस्त्रायल-इराण यांच्यातील ही छायायुद्धे आता अधिक धोकादायक व अत्याधुनिक स्वरूपात पुढे जात आहेत. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही, तर त्याचे परिणाम जगभरातील औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्पांवर दिसू शकतात, असा इशारा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com