
daily same workout risk : आपल्या रोजच्या व्यायामाच्या सवयीवर आपण खूप प्रेम करतो. एकाच प्रकारचा व्यायाम रोज करायला कंटाळा येत नाही, उलट तोच व्यायाम करण्यामध्ये एक प्रकारचा आनंद मिळतो. पण असा एकच व्यायाम रोज करणे आरोग्यासाठी चांगले आहे का? याचे उत्तर थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ असे देता येणार नाही. हे पूर्णपणे तुमच्या आरोग्यदृष्टिकोनावर, फिटनेस पातळीवर आणि व्यायामाच्या प्रकारावर अवलंबून असते. संशोधनातून यासंबंधीत माहिती समोर आली आहे
प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक अलेना बेस्कुर यांच्या मते, जर तुम्ही आरोग्यदृष्ट्या सशक्त असाल आणि कोणत्याही शारीरिक समस्या नसतील, तर दररोज एकाच प्रकारचा कार्डिओ व्यायाम (जसे की धावणे, चालणे, सायकल चालवणे) करणे चालू शकते. मात्र त्याची तीव्रता फार जास्त असल्यास, विशेषतः हृदय किंवा सांध्यांच्या समस्या असणाऱ्यांसाठी तो धोकादायक ठरू शकतो.
जर तुम्ही कोणतीही दुखापत नसलेले, योग्य पोषण घेतलेले आणि तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करत असाल, तर आठवड्यातून ५ ते ७ दिवस एकाच प्रकारचा कार्डिओ करणे सुरक्षित आहे. पण यातही दररोज चालणे, बागकाम करणे, जिने चढणे यांसारखी सौम्य हालचालही गृहीत धरली जाते.
ज्यांनी वजन उचलण्याचे (strength training) व्यायाम केले आहेत, त्यांना माहीत असेल की यामुळे स्नायूंमध्ये सूक्ष्म फाटोळ्या निर्माण होतात. त्या दुरुस्त होण्यासाठी विश्रांती आवश्यक असते. जर दररोज तोच भाग पुन्हा पुन्हा व्यायामात वापरला गेला, तर त्या स्नायूंना बरे होण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे थकवा, दुखापत आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्याची शक्यता असते.
पण जर दररोज जिमला जायचं ठरवलं असेल, तर वेगवेगळ्या स्नायू गटांवर वेगवेगळ्या दिवशी लक्ष केंद्रित करणे ही उत्तम युक्ती आहे. उदा. सोमवार - फक्त पाय, मंगळवार - फक्त हात, बुधवार - पाठ. त्यामुळे रोज व्यायाम होतो, पण प्रत्येक स्नायूला विश्रांतीही मिळते.
एकाच प्रकारचा व्यायाम कंटाळवाणा होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायामात बदल करणे फायदेशीर ठरते. नवीन व्यायाम प्रकार तुमच्या शरीराला नवीन प्रकारे आव्हान देतात, वेगळे स्नायू गट कामात घेतात, आणि व्यायामात रस कायम ठेवतात. एखाद्या नवीन कार्डिओ मशीनवर काम करणे किंवा नवीन योगाभ्यास शिकणे हा सुद्धा बदलच ठरतो.
तुम्ही कितीही फिट असलात तरीही विश्रांतीचे दिवस घ्या, असं अलेना बेस्कुर सुचवतात. कारण
स्नायूंच्या दुरुस्तीसाठी वेळ मिळतो.
जास्त ताणामुळे होणाऱ्या दुखापतींपासून संरक्षण मिळते.
शरीरातील उर्जा स्त्रोत (ATP) परत निर्माण होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.