कोरोनाचा 'तो' व्हेरियंट आता इस्रायलमध्येही; दक्षिण आफ्रिकेत माजवलाय हाहाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

कोरोनाचा 'तो' व्हेरियंट आता इस्रायलमध्येही; दक्षिण आफ्रिकेत माजवलाय हाहाकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जेरुसलेम: इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या देशात नव्या कोरोना व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. मालावीमधून परतलेल्या एका प्रवाशाला या व्हेरियंटची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढे सांगितलंय की, हा प्रवासी आणि आणखी दोन संशयित रुग्ण यांना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. या तिघांचंही लसीकरण झालेलं होतं. मात्र, त्यांच्या लसीकरणाची नेमकी स्थिती काय आहे याबाबत सध्या खातरजमा केली जात आहे. काल गुरुवारी रात्री उशिरा इस्रायल सरकारने दक्षिण आफ्रिका आणि इतर सहा आफ्रिकन राष्ट्रांना “रेड कंट्रीज्” म्हणून घोषित केलं आहे. या देशातून इस्रायलकडे येण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: '२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार

साऊथ अफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट चिंतेचं कारण असल्याचं संशोधकांकडून सांगण्यात आलंय, कारण या व्हेरियंटचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. साऊथ अफ्रिकेतील गुटेंग शहरात याचा प्रसार वेगाने झाला आहे.

दक्षिण अफ्रिकेत आढळला व्हेरियंट

दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. नव्या प्रकारच्या व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होण्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नव्या प्रकारच्या व्हेरिएंटवर सध्याची लस अप्रभावी ठरू शकते. याशिवाय रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला डेल्टापेक्षाही कोरोनाचा B.1.1529 व्हेरिएंट भयानक का असू शकतो याबाबतच्या 10 गोष्टी सांगणार आहोत.

कोरोनाच्या B.1.1.1.529 प्रकारात एकूण 50 प्रकारचे म्यूटेशन आहेत. यापैकी 30 प्रकारचे म्यूटेशन केवळ स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाइक प्रोटीन हे बहुतेक COVID-19 लसींचे लक्ष्य आहे आणि हे विषाणूला आपल्या शरिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम करते. दरम्यान, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे का? यावर शोध घेण्याचे काम संशोधक करत आहेत.

loading image
go to top