'२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार | Narayan rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narayan rane

'२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार

मुंबई: "सरकार (Govt) पडणार ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) बोलायचे. आता नारायण राणे (Narayan rane) यांनी टेंडर घेतले आहे" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केली.

"काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय. भाजपचे जुने नेते थकले. आता नव्या प्लेयर ला जबाबदारी दिली आहे. सरकार पडणार नाही स्पष्ट आहे" असे नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा: नवरा कॉलेजमध्ये असताना सासऱ्याने बलात्कार केला, सूनेची पोलिसात तक्रार

"दोनवर्ष कोरोना काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले. मदत केली. सरकारने कोरोना परिस्थिती योग्य रीतीने सांभाळली. विकास कामे ही सरकारने थांबू दिली नाहीत. महत्वाचे निर्णय सरकारने दोन वर्षात घेतले" असे मलिक म्हणाले. "नव्या रोजगार निर्मितीचा नवा उपक्रम ही सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे काम पुढे ही महाविकासाचे आघाडी सरकार करेल" अशा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

loading image
go to top