
जेरुसलेम: गाझा पट्टीवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई मारा केल्यानंतर इस्राईलने गाझा शहरातील लष्करी कारवाईला सुरुवात करत असल्याचे जाहीर केले. हमासची लपण्याची ठिकाणे आणि आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली असून येथील नागरिकांनी गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील शहरांमध्ये निघून जावे, असे आवाहन इस्राईल सरकारने केले आहे.