
जेरुसलेम: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझावर कब्जा करण्याचा मनसुबा रचला आहे. एका अहवालानुसार, इस्रायली सुरक्षा परिषदेने त्यांच्या या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने गाझावर कब्जा करणार नाही, असे म्हटले होते. परंतु, आता रॉयटर्सच्या एका अहवालानुसार नेतन्याहू यांच्या योजनेला सुरक्षा परिषदेची मंजुरी मिळाली आहे.