Israel-Hamas War: आता हमासने इस्राइलसमोर ठेवली नवी अट, 'सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करा अन्यथा...'

सर्व ओलीसांना सोडण्यास तयार असून यासाठी हमासने इस्राइलला एक अट घातली आहे
Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal

इस्राइलसोबत सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या दरम्यान हमासने काल(बुधवारी) 16 ओलिसांची सुटका केली आहे. यासोबतच सर्व ओलीस सोडण्यास तयार असल्याचे हमासने पुढे म्हटले आहे. मात्र यासाठी इस्राइलला एक अट देखील घातली आहे.(Latest Marathi News)

हमासचे वरिष्ठ अधिकारी आणि गाझाचे माजी आरोग्य मंत्री बासेम नइम यांनी म्हटले आहे की, जर इस्राइलने इस्लामिक चळवळीत कैद झालेल्या सर्व 7000 पॅलेस्टिनींची सुटका केली तर ते इस्रायली सैनिकांसह सर्व कैद्यांना सोडण्यास तयार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तर हमास इस्राइलशी शत्रुत्व संपवण्यासाठी चर्चा करत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या सर्व कैद्यांच्या बदल्यात त्यांचे सर्व सैनिक सोडण्यास तयार आहोत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एबीपी हिंदी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Israel-Hamas War
Henry Kissinger Passed Away: अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचं १०० व्या वर्षी निधन

नेतान्याहू यांनी युद्ध सुरू करण्याची केली घोषणा

हमास आणि इस्राइल यांच्यातील युद्धविराम करारानुसार ६० इस्रायली ओलीस आणि 180 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविरामानंतर गाझामध्ये पुन्हा युद्ध सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर हमासकडून हे नवे वक्तव्य समोर आले आहे. (Marathi Tajya Batmya)

Israel-Hamas War
America : मांजराच्या पिलाला झाला रेबिज, अमेरिकेत लॉकडाऊनजन्य परिस्थिती, डॉक्टरही चक्रावले

हमासने 2011 मध्येही ही पद्धत वापरली होती

अशा अटींच्या आधारे हमासने 2011 मध्ये इस्राइलमधून 1100 कैद्यांची सुटका केली आहे. त्यानंतर हमासने इस्रायली सैनिक गिलाड शालितच्या बदल्यात शेकडो पॅलेस्टिनींची सुटका केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आताही 7000 हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायली तुरुंगात बंद आहेत, त्यापैकी बहुतेक हमासचे सदस्य आहेत.

हमासच्या सैनिकांनी 7 ऑक्टोबर रोजी अचानक इस्राइलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 1200 लोक मारले गेले होते. या काळात हमासच्या सैनिकांनी सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवले होते. प्रत्युत्तर म्हणून, इस्राइलने गाझावर वेगाने हल्ले केले, ज्यात 15,000 हून अधिक लोक मारले गेले. (Marathi Tajya Batmya)

Israel-Hamas War
'खलिस्तानी अतिरेकी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीयाविरोधात आरोपपत्र'; अमेरिकेचा गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com