तेल अविव: शांतता प्रस्तावाचा भाग म्हणून हमासने परत दिलेल्या चार मृत अपहृतांपैकी एकाचे शव हे अनोळखी व्यक्तीचे असल्याचा आरोप इस्राईल सरकारने केला आहे. यामुळे या भागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे..गाझा पट्टीत शांतता प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याचा एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी इस्राईलने त्यांच्या कैदेत असलेल्या १९०० हून अधिक पॅलेस्टिनींची सुटका केल्यानंतर हमासनेही त्यांच्याकडील अपहृतांची सुटका केली. तर, ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेल्या अपहृतांचे मृतदेहही परत केले जात आहेत. हमासने मंगळवारी असे चार मृतदेह परत केले. त्यांची तपासणी केली असता एक मृतदेह अपहृत व्यक्तीचा नसल्याचे उघड झाल्याचे इस्राईलने म्हटले आहे. अपहृतांचे मृतदेह परत करण्याबाबत शांतता करारात निश्चित केलेल्या नियमांचे हमासने पालन करणे आवश्यक असून आम्ही त्यात कोणतीही तडजोड करणार नाही, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे..हमासने यापूर्वीही चुकीचा मृतदेह इस्राईलला दिला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या देवाणघेवाणीत त्यांनी अपहृत ज्यू महिलेचा म्हणून दिलेला मृतदेह एका पॅलेस्टिनी महिलेचा असल्याचे सिद्ध झाले होते. त्यावर इस्राईलने संताप व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हमासने योग्य मृतदेह परत केला होता..मुख्य डॉक्टर अद्याप अटकेतचलष्करी कारवाईदरम्यान इस्राईलने गाझा पट्टीतून ताब्यात घेतलेल्या शेकडो डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना सोडून दिले असले तरी शंभरहून अधिक महत्त्वाच्या व्यक्तींना अद्यापही डांबून ठेवले आहे. यामध्ये डॉ. होसम अबु साफिया यांचा समावेश आहे. ते उत्तर गाझामधील कमाल अदवान रुग्णालयाचे संचालक आहेत. इस्राईलचा बाँबवर्षाव सुरू असतानाही आपल्या कर्तव्याचे पालन करत जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांवर उपचार केले होते. त्यामुळे गाझा पट्टीत ते लोकप्रिय बनले. डॉ. साफिया हे मागील दहा महिन्यांपासून इस्राईलच्या ताब्यात असून त्यांच्यावर अद्याप कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.