Israel Hamas: इस्राईल-हमासदरम्यान शस्त्रसंधीबाबत चर्चा
Middle East Conflict: इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत असून इजिप्तमध्ये उद्या शस्त्रसंधीबाबत चर्चा होणार आहे. गाझामध्ये शस्त्रसंधी, सैनिक माघारी आणि कैद्यांच्या बदलाबाबत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
कैरो : इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाला उद्या (ता. ७) दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिनिधींमध्ये उद्या इजिप्तमधील एका रिसॉर्टमध्ये शस्त्रसंधीबाबत चर्चा होणार आहे.