Israel-Hamas Crisis:गाझामध्ये मदतसाहित्याचा ओघ सुरू! अन्न व औषधांचा पुरवठा; हमासकडून १४ अपह्रतांची सुटका होणार

इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्यांना तूर्त विराम लागल्याने गाझामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
Hamas Vs Israel
Hamas Vs Israelsakal
Updated on

Israel Hamas Crisis: इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्यांना तूर्त विराम लागल्याने गाझामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नागरिकांपर्यंत बचावसाहित्य पोहोचविण्यात हवाई माऱ्यामुळे आतापर्यंत येत असलेली अडचण सध्या दूर झाली असल्याने इजिप्तच्या सीमेवरुन अनेक ट्रकद्वारे औषधे, अन्नपदार्थ, पाणी आणि इतर वस्तू आणल्या जात आहेत. दरम्यान, आजही १३ ते १४ अपह्रतांची सुटका होण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुटका झाली नव्हती.

अमेरिका आणि कतार यांच्या मध्यस्थीने इस्राईल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनुसार, हमासच्या ताब्यात असलेल्या २४० अपह्रतांपैकी ५० जणांना सोमवारपर्यंत सोडले जाणार आहे. हमासने इस्राईलच्या १३ जणांना काल मुक्त केले. याशिवाय, थायलंडच्या दहा आणि फिलिपिन्सच्याही एका नागरिकाची हमासने सुटका केली. याबदल्यात इस्राईलने हवाई हल्ले थांबविण्याबरोबरच त्यांच्या ताब्यात असलेल्या ३९ पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. १५० पॅलेस्टिनींना सोडण्याचे आश्‍वासन इस्राईलने दिले. हमासने सोडलेल्या प्रत्येक इस्रायली नागरिकामागे तीन पॅलेस्टिनींना सोडण्याचे करारात मान्य झाले.

हल्ले थांबल्यामुळे गाझा पट्टीत मदत साहित्याचा ओघ सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून ही मदत विस्थापितांपर्यंत पोहोचविली जात आहे. अन्नपदार्थ, पाणी आणि औषधांचा साठा रोजच्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात गाझा पट्टीत पाठविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Hamas Vs Israel
Import From China: चीनच्या व्यापाऱ्यांकडून 'असा' चुकवला जातोय कर, भारतीय कापड उद्योगाला फटका; आयातबंदीची मागणी

हवाई माऱ्यामुळे अनेकांपर्यंत ही मदत पोहोचतच नव्हती. याशिवाय, एक लाख २९ हजार लिटर इंधनही गाझात पाठविले जात आहे. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच स्वयंपाकाचा गॅसही गाझा पट्टीत पुरविण्यात आला आहे.

मालवाहू जहाजावर हल्ला

दुबई : इस्राईलमधील एका अब्जाधीशाच्या मालकीच्या मालवाहू जहाजावर आज ड्रोन हल्ला झाला. हिंदी महासागरातून जात असताना शाहीन-१३६ या ड्रोनद्वारे हल्ला झाला. जहाजावर आदळून ड्रोनचा स्फोट झाल्याने जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले. इस्राईल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून इस्राईलशी संबंधित जहाजांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Latest Marathi News)

Hamas Vs Israel
OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com