OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

मुंबईः मराठवाड्यातल्या हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने हिंगोलीकडे रवाना झाले आहेत.

अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले.

Chhagan Bhujbal
गोफण | 'प' से पनौती नहीं... पर्णकुटी!

दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हिंगोली येथे सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. जालन्याच्या अंबडमध्ये पहिल्या सभेत भुजबळांनी आक्रमक भाषण केल्याने त्यांचा निषेध केला जात आहे.

मराठा आरक्षणाचा लढ एकीकडे सुरु असताना छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरून तू-तू..मैं-मैं.. होत आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange : ''प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मला मान्य, पण...'', काय म्हणाले मनोज जरांगे?

छगन भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आमची सभा घेण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही, ओबीसी समाज जशास तसं उत्तर देईल आणि भुजबळांची सभा होईल. मनोज जरांगेंनी आंदोलकांना आवरावं'' असं आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com