Israel-Hamas War: अखेर इस्राइल-हमास युद्ध थांबणार? संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या प्रस्तावाला मिळाले समर्थन

United Nations on Israel-Hamas War: हमासने अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी मांडलेल्या तीन टप्प्यातील युद्धबंदी प्रस्तावाचे स्वागत केले आहे
United Nations
United NationseSakal

तेल अविव- इस्त्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेला संघर्ष संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हमासने अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांनी मांडलेल्या तीन टप्प्यातील युद्धबंदी प्रस्तावाचे स्वागत केले आहे. जो बायडेन यांनी इस्राइलच्या बाजूने हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडला होता. सुरक्षा परिषदेमध्ये याचे समर्थन करण्यात आले आहे.

युद्ध संपवण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सामंजस्य करार स्वीकारण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. हमासने यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे याबाबत काही चांगले घडण्याची अपेक्षा आहे. मात्र, रशियाने यावेळी देखील विरोधाची भूमिका घेतली आहे.

United Nations
Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

रशियाने विरोधात मतदान केले आहे. दुसरीकडे, सुरक्षा परिषदेतील १४ देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं आहे. अमेरिकीच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी यावर म्हटलं की, आम्ही शांततेसाठी मतदान केलं आहे. प्रस्तावाला दोन्ही देशांनी कोणत्याही अटी-शर्तीशिवाय पालन करावे अशी आमची मागणी आहे.

सुरक्षा परिषदेमध्ये एकमेव अरब सदस्य अल्जिरियाने प्रस्तावाच्या बाजूने समर्थन दिले आहे. अल्जिरियाचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत अमर बेंडजामा म्हणाले की, 'आता हिंसा थांबवण्याची वेळ आली आहे. हा प्रस्ताव पॅलेस्टिनी नागरिकांसाठी एक आशेचा किरण आहे. युद्धबंदीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.'

United Nations
Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

संयुक्त राष्ट्रातील इस्राइलचे राजदूत गिलाद एर्दान हे मतदानावेळी उपस्थित होते. पण, त्यांनी परिषदेला संबोधित केले नाही. इस्राइलचे संयुक्त राष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी रुत शापिर बेन नेफ्ताली म्हणाले की, 'गाझामधील आमचे लक्ष्य एकदम स्पष्ट आहे. आमच्या ध्येयाप्रती आम्ही प्रतिबद्ध आहोत. सर्व अपहृतांना मुक्त करणे, हमासचे सैन्य आणि शासन क्षमता नष्ट करणे आणि भविष्यात इस्राइलसाठी काही धोका निर्माण होऊ नये याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. युद्ध संपवण्यापासून हमासच रोखत आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com