Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Somaiya School: माझ्या अभिव्यक्तीमुळे द्वेषपूर्ण भावना भडकतील आणि पक्षपाती अजेंडे सक्रिय होतील हे अजिबात कल्पनेत नाही." यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही यावर जोर दिला.
Parveen Shaikh|Somaiya School
Parveen Shaikh|Somaiya SchoolEsakal

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेतच नाही तर भारतातही दिसून येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध सोमय्या शाळेच्या महिला मुख्याध्यापकांनी या युद्धासंदर्भात सोशल मीडियावर अशी पोस्ट केल्याचा आरोप आहे, ज्यावरून शाळा चालवणाऱ्या ट्रस्टने मुख्याध्यापकांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र मुख्याध्यापकांनी पद सोडण्यास नकार दिला आहे. मी माझे 100 टक्के शाळेला दिले असल्याने मी राजीनामा देणार नाही असे त्या म्हणत आहेत. त्यांनी हमासच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता या महिला मुख्याध्यापकांना अनेक पालकांचा पाठिंबा मिळत आहे.

परवीन शेख असे शाळेच्या महिला मुख्याध्यापकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या 12 वर्षांपासून शाळेश काम करत असून, गेल्या 7 वर्षांपासून त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

ओप इंडिया या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, परवीन शेख यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर पॅलेस्टाईन आणि हमास-इस्रायल संघर्षाच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहिले? हे माहीत नाही पण पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबाबत त्यांच्या पोस्टमध्ये उदारमतवादी विचार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी हमासबद्दल सहानुभूती व्यक्त केली. या मुद्द्यावरून प्रचंड खळबळ उडाली आहे.

Parveen Shaikh|Somaiya School
Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

राजीनामा द्यायला सांगितल्याच्या दाव्याची पुष्टी करताना, परवीन शेख म्हणाल्या, “26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने मला सांगितले की, त्यांच्यासाठी हा एक कठीण निर्णय होता आणि त्यांनी मला राजीनामा देण्यास सांगितले… मी पुढील काही दिवस काम करत राहिली पण व्यवस्थापन प्रतिनिधींकडून राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

Parveen Shaikh|Somaiya School
Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

शेख यांच्या मते, “मी लोकशाही भारतात राहते आणि मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण तो लोकशाहीचा पाया आहे. माझ्या अभिव्यक्तीमुळे अशा द्वेषपूर्ण भावना भडकतील आणि पक्षपाती अजेंडे माझ्या विरोधात सक्रिय होतील हे अजिबात कल्पनेत नाही." यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही यावर जोर दिला.

वेबपोर्टलवर आपल्या विरोधात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत असा अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे, सोमय्या ट्रस्टशी संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यांवर त्यांचे वैयक्तिक विचार व्यक्त करण्याची परवानगी आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही वैयक्तिक मते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com