Israel Hamas War: इस्रायलमधील भारतीयांसाठी भारत सरकारनं काढली अॅडव्हायजरी; दिला 'हा' महत्वाचा सल्ला

Israel Hamas War : इस्रायल-हामास युद्धातील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा नुकताच मृत्यू झाला.
PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal

Israel Hamas War Marathi News: इस्रायल-हामास युद्धातील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा नुकताच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी भारत सरकारनं अॅडव्हायजरी जाहीर केली आहे. (israel hamas war govt of india issues advisory for indians in israel)

PM Narendra Modi
CJI DY Chandrachud: "तुम्ही ही केस..." ; जेव्हा CJI चंद्रचूड यांनी अभिषेक मनु सिंघवीची केली चेष्टा, कोर्टात नेमकं काय घडलं?

भारत सरकारनं काढलेल्या अॅडव्हायजरीत म्हटलं की, सध्या इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीय नागरिक विशेषतः जे दक्षिण आणि उत्तर सीमावर्ती भागात काम करतात त्यांना सल्ला दिला जातो की, त्यांनी स्वतः इस्रायलमधील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावं. तसेच भारतीय दुतावास भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे. (Latest Marathi News)

PM Narendra Modi
Share Market Closing: शेअर बाजारातील 4 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 195 अंकांनी घसरला, कोणत्या क्षेत्रात वाढ?

जर भारतीय नागरिकांना काही तातडीची मदत लागल्यास त्यांनी दुतावासाच्या +972-35226748 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच cons1.telaviv@mea.gov.in या ईमेलवर संपर्क करावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर १७००७०७८८९ या हॉटलाईनवर संपर्क करावा, असं आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर इस्रायलमधील भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे की, ही अॅडव्हाजरी त्यांनी आपल्या लोकल नेटवर्कसोबत शेअर करावी तसेच सर्वांपर्यंत पोहोचवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com