
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज इस्रायल दौऱ्यावर आहेत. याशिवाय ते अम्मान, जॉर्डन येथे अरब नेत्यांशी चर्चा करणार होते, जी गाझा येथील अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटानंतर रद्द करण्यात आली आहे. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसाठी हमास आणि इस्रायल एकमेकांवर आरोप करत आहेत.
गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत अम्मानमधील बायडन यांची शिखर बैठक रद्द करण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसनेही जॉर्डनमध्ये बायडन यांच्यासोबतची शिखर परिषद रद्द केल्याची मीहिती दिली आहे. व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईनच्या नेत्यांसोबत अम्मानमध्ये शिखर परिषद होणार होती, मात्र आता गाझा येथील हॉस्पिटलवर बॉम्बस्फोट झाल्यानंतर जॉर्डनने ही बैठक पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनीही व्यक्त केला शोक
गाझा येथील रूग्णालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "गाझा येथील अल अहली अरब हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटामुळे आणि जीवित व मालमत्तेची हानी झाल्याने मी दु:खी झालो आहे. या घटनेची माहिती मिळताच मी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी बोललो. घटना आणि प्रत्यक्षात काय घडले याची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, युनायटेड स्टेट्स संघर्षाच्या काळात नागरिकांच्या जीवनाच्या रक्षणासाठी उभे आहे आणि आम्ही या शोकांतिकेत मृत किंवा जखमी झालेल्या रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर निष्पाप लोकांसाठी शोक व्यक्त करतो.
हमास आणि इस्रायल यांनी एकमेकांवर केले आरोप
रुग्णालयावरील या हल्ल्यासाठी अरब देशांनी इस्रायलला जबाबदार धरले आहे, तर इस्रायल संरक्षण दलाने त्याचा इन्कार केला आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी या स्फोटासाठी पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादच्या रॉकेटला जबाबदार धरले आहे. गाझा पट्टीतील रुग्णालयावरील या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राजनैतिक प्रयत्न थांबले आहेत. वास्तविक, या बैठकीद्वारे, बायडन इस्रायलच्या संरक्षणाच्या अधिकारासाठी समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करत होते.
जेव्हा 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, ज्यामध्ये 1300 हून अधिक लोक मारले गेले आणि 200 लोकांना ओलिस ठेवण्यात आले. त्यावेळीही बायडन यांनी इस्रायलची बाजू घेत त्यांना अपला बचाव करण्याचा आधिकार असल्याचं म्हटलं होतं.
इस्रायलने हल्ल्याचा केला इन्कार
गाझा शहरातील अल अहली अरब हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटानंतर, हमासने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले, परंतु इस्रायलने लगेचच आरोप फेटाळून लावले आणि इस्लामिक गटाची चूक झाल्याचे ठामपणे सांगितले. आयडीएफने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कस्तान यांनीही इस्रायलवर गाझा येथील रुग्णालयात बॉम्बफेक केल्याचा आरोप केला आहे. इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटनेने इस्रायलचे आरोप फेटाळून लावले आहेत. या हल्ल्यानंतर बहरीनने तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.
युएई, रशियाने संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन बैठक बोलावली
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, युएई आणि रशियाने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यात 500 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
गाझा पट्टीतील अल अहली अरब रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनेही निषेध केला आहे. डब्ल्यूएचओने एक निवेदन जारी करून सांगितले की, रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काळजीवाहू आणि अनेक विस्थापित लोकांनी तेथे आश्रय घेतला, प्राथमिक अहवालात शेकडो मृत्यू सूचित केले गेले.
इस्त्रायली सैन्याने उत्तर गाझामधून लोकांना बाहेर काढण्याचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार रुग्णालयांचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.